संध्याकाळ होताच घरामध्ये मच्छरांचा शिरकाव सुरू होतो. बरं, या मच्छरांना रोखण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उपकरणं मिळतात. अगदी मॉस्किटो रॅकेटपासून पार इलेक्ट्रिक कॉईल पर्यंत. आणि मच्छर अगरबत्तीपासून मॉस्केटो क्रिम पर्यंत असंख्य पर्याय बाजारात मिळतात. पण तरी देखील कुठलाच पर्याय १०० टक्के काम करतो असं म्हणता येत नाही.
पण या समस्येवर खुद्द आनंद महिंद्रा यांनी एक कमालिचा तोड शोधून काढलाय. त्यांनी अशा एका मशिनचा व्हिडीओ शेअर केलाय. ही मशिन जर का तुमच्याकडे असेल तर तुमच्या घरातीलच काय तर पार अख्खा सोसायटीमधील मच्छर तुम्ही गायब करू शकता.
उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. कधी ते मोटिव्हेशनल स्टोरीज शेअर करतात तर कधी एखादा गंमतीशीर किस्सा. पण यावेळी त्यांनी मुंबईचं नाव घेत लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळला आहे. अन् तो म्हणजे मच्छर. या मच्छरांमुळे लोकं अगदी हैराण झाली आहेत. पण त्यांना मारण्यासाठी आपण आर्यन डोम वापरू शकतो असं महिंद्रा म्हणताहेत. बरं, मशिन काम कसं करतं याबद्दल माहिती देणारा एक व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केलाय. आर्यन डोम ही एक सुरक्षा प्रणाली आहे. या टेक्नोलॉजीचा वापर युद्धामध्ये केला जातो. यामध्ये एक एअर डिफेन्स सिस्टम असते. त्यामुळे शत्रूनं जर हवेतून हल्ला केला तर त्वरीत आपल्याला माहिती मिळते. आणि आपण त्या हल्ल्याला परतवण्यासाठी तयारी करू शकतो. तर याच मशिनचं मिनी मॉडेल एका चीनी तरुणानं तयार केलंय.https://x.com/anandmahindra/status/1827203616119116119