पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन यांची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पब्जि खेळताना दोघांची मैत्री आणि पुढे प्रेमात रुपांतर झालं. सचिनच्या प्रेमात वेडी झाली सीमा आपल्या ४ मुलांसह अवैद्यरित्या भारतात आली अन् आता ती भारतीय नागरीकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न आहे. दरम्यान तिच्यावर अनेकांनी टीका केली. यापैकी एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. “लप्पूसा सचिन है, झिंगूरसा लडका, क्या है सचिन में, याला प्रेम म्हणतात का?” अशी कडाडून टीका एका महिलेनं केली होती. या महिलेच्या वाक्यांपासून यशराजनं गाणं तयार केलं आहे. यशराजनं yashrajmukhate या आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणं आतापर्यंत १८ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिलं असून अनेकांनी यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.






