जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी संभाजी आव्हाड व प्रशांत निमसे यांची निवड
अहमदनगर – अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को ऑप क्रेडीट सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी (स्वीकृत )शेवगाव तालुक्यातील ढोरजळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक संभाजी किसन आव्हाड व सा.बां.उपविभाग पंचायत समिती, पारनेर येथील कनिष्ठ सहाय्यक प्रशांत भास्कर निमसे यांची निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाची मासिक सभा नुकतीच संस्थेच्या कार्यालयात चेअरमन योगेंद्र पालवे यांच्या अध्यक्षते खाली झाली. या सभेत पॅनल प्रमुख संजय कडूस यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार संस्थेच्या सभासदांमधून २ तज्ञ संचालक नियुक्त करण्याची तरतूद असून त्यानुसार नूतन तज्ञ संचालकांची नियुक्ती करावी अशी सूचना मांडली. त्यास उपस्थित सर्व संचालकांनी सहमती दर्शवित एकमताने संभाजी आव्हाड व प्रशांत निमसे यांची निवड केली.सदर प्रसंगी चेअरमन योगेंद्र पालवे, व्हा चेअरमन डॉ. दिलीप डांगे व सर्व संचालक यांनी नूतन स्वीकृत संचालकांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी संचालक प्रशांत मोरे, विक्रम ससे, विलास शेळके, अरुण जोर्वेकर, भाऊसाहेब चांदणे, इंजि. राजू दिघे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्नील शिंदे, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, अर्जुन मंडलिक, संचालिका श्रीमती ज्योती पवार, श्रीमती सुरेखा महारनूर, श्रीमती मनीषा साळवे, व्यवस्थापक राजेंद्र पवार, उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी यांची निवड
- Advertisement -