पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलांतर्गत प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजीव शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेश आणि चंदीगडची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रियांका गांधी यांना सध्या कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. जयराम रमेश यांच्याकडे संचाराची जबाबदारी तर, केसी वेणुगोपाल यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आहे. दिल्लीत शनिवारी झालेल्या महत्वाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पक्षाने ही माहिती दिली आहे.
याशिवाय मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी बनवण्यात आले आहे. जितेंद्र सिंह यांची आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगड आणि कुमारी शैलजा यांच्याकडे उत्तराखंडची कमान सोपवण्यात आली आहे.
दीपक बाबरिया यांना दिल्लीचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्यांच्याकडे हरियाणाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे. त्याचबरोबर जीए मीर यांना झारखंडचे प्रभारी बनवण्यात आले असून त्यांच्याकडे पश्चिम बंगालचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दीपा दास मुन्शी यांच्याकडे केरळ आणि लक्षद्वीपची जबाबदारी आली असून त्यांच्याकडे तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभारही आहे.
https://twitter.com/AshokChavanINC?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1738565171973599744%7Ctwgr%5E5b93a8aaacdacfa32a16ee00ffded0cfc360b87b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Flok-sabha-election-congress-leader-ramesh-chennithala-appointment-as-aicc-incharge-of-maharashtra-congress-sbk90