Tuesday, January 21, 2025

सोमवारपासून नगर शहरात पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, फायर सुविधा, लाईट, स्वच्छता, बंद

नगर : अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबितसातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण सुरू केले असून ६ व्या दिवशी उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत घालवली असल्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले असून सोमवारपासून शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, फायर सुविधा, लाईट, आरोग्यसेवा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे, तरी सरकारने त्याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली,
सोमवार पर्यंत आमचा प्रश्न मार्गी न लागल्यास त्यानंतर अन्न बरोबर पाण्याचा त्याग केला जाईल असा इशारा उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल यांनी दिला
सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्यांची तब्येत घालवली आहे , उपोषणाला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

महापालिकेसमोर सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर हे उपोषणाला बसले असून आज सहाव्या दिवशी त्यांची तब्येत घालवली आहे, जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर उपोषण स्थळी सलाईन लावण्यात आली तर बाबासाहेब मुदगल यांनी सलाईन घेण्यास विरोष दर्शवला, उपोषणकर्ते बाबासाहेब राशिनकर यांचा बीपी वाढला असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे याचबरोबर उपोषणकर्त्यांचे सुमारे ४ किलो वजन घटले असून शुगर लेवलही खालवली असून साठवर आली आहे त्यामुळे त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला असल्याचा आरोग्य विभागाने सांगितले आहे,

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles