एस.जी.कायगांवकर सुवर्ण दालनातील विश्वसनीय सुवर्ण खरेदी आता 24 बाय 7….
‘एसजीके ई गोल्ड’ ॲपचे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर शनिवारी लोकार्पण
नगर: तब्बल ८७ वर्षांच्या विश्वसनीय सुवर्ण सेवेचा नावाजलेल्या नगरमधील प्रसिद्ध एस.जी. कायगांवकर सुवर्ण दालनाने आता डिजिटल माध्यमातून ग्राहकांना २४ कॅरेटचे अस्सल सोने आणि चांदीची नाणी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एसजीके ई गोल्ड या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या २४ तास कधीही त्या दिवशीच्या बाजारभावाने ही खरेदी करता येणार आहे. ॲपवरच बिलिंगची व्यवस्था असणार असून ग्राहकांना त्यांच्या खरेदीचे इ बिल लगेचच मिळणार आहे. नगर तसेच परगावी असलेल्या आणि एस. जी. कायगांवकर सुवर्ण दालनाच्या ग्राहकांसाठी आधुनिक युगातील ही अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिली असून या नवीन ॲपचे लोकार्पण शनिवार दि. ७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता एल अँड टी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट (बिझनेस) अरविंद पारगांवकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सुभाष शेठ कायगांवकर यांनी दिली.
कायगांवकर यांनी सांगितले की, आताच्या डिजिटल युगात कोणतीही खरेदी अक्षरशः २४*७ उपलब्ध आहे. यात सुवर्ण खरेदीही ग्राहकांना उपलब्ध व्हावी यासाठी एसजीके ई गोल्ड (SGk e-gold) ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. सायबर सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत ॲप तयार करण्यात आले आहे. यात ग्राहकांना अक्षरशः 24 तास 24 कॅरेट सोने, ज्यात वेढणी, नाणी खरेदी करता येईल. तसेच चांदीचे नाणीही खरेदी करता येणार आहेत. त्यादिवशीचे सोन्या चांदीच्या बाजारभावानुसार ही खरेदी होईल. ग्राहकांना संपूर्ण बिल ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार प्रत्यक्ष दालनात येऊन आपली वस्तू घेऊ शकतील. तसेच त्यांना या खरेदीच्या बदल्यात मनपसंत दागिनेही खरेदी करू शकतील. कमीत कमी 1 हजार ते 2 लाखांपर्यंतची खरेदी या ॲपवर होऊ शकते.
एखाद्या ग्राहकाला ऑनलाईन खरेदी केलेले सोने विक्री करायचे असल्यास ती सोयही ॲपवर उपलब्ध आहे. एकूणच तुमचा मोबाईल आणि आमचे ॲप तुम्हाला विश्वसनीय सोने खरेदीचा आनंद देणार आहे. एस.जी. कायगांवकर सुवर्ण दालन विश्वासार्ह खरेदीसाठी नावाजले जाते. नगरसह व्यवसाय, नोकरीनिमित्त देश प्रदेशात स्थायीक झलेले ग्राहकही सोने -, चांदी खरेदीसाठी याच दालनाला प्राधान्य देतात. अनेकदा मुहुर्तावरील खास सुवर्ण खरेदीसाठी ग्राहकांना प्रत्यक्ष दालनात येणे शक्य होत नाही. अशा सर्वच सन्माननीय ग्राहकांना हे नवीन ॲप उपयुक्त ठरणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर सदर ॲप डाऊनलोड करून ग्राहकांनी या आधुनिक सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कायगांवकर यांनी केले आहे.
*Start Saving Smartly!!*
We have just the right solution for you.
*SGK e-Gold*
Download the app & start saving today- https://onelink.to/sgkegold
T&C apply.