Tuesday, February 27, 2024

नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला शंकराचार्यांचे जोरदार प्रत्युत्तर…

भाजप नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांच्या योगदानावर सवाल उपस्थित करताना, त्यांच्यावर टीका केली होती. ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी नारायण राणेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “हजारो वर्षापासून देश गुलामित होता. विधर्मियोंच्या नियंत्रणाखाली होता. पण तरीही आज सनातन धर्म टिकून आहे. नारायण राणे आपले माता-पिता, आजी-आजोबांसोबत सनातन धर्माच पालन करतायत, त्यामागे कुठली 100 वर्षांची संघटना किंवा 45 वर्षांचा पक्ष नाहीय. हे अडीच हजार वर्षांपासूनच्या शंकराचार्यांच्या परंपरेमुळे शक्य झालय” असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांनी म्हटलय.

आम्ही कुठे शाप दिलाय. आम्ही आतापर्यंत शाप शब्द उच्चारलेला नाही. आम्ही सुद्धा आशिर्वाद देतोय. नारायण राणेंना सुद्धा आशिर्वादच देतोय. त्यांच्या पक्षालाही सगळे आशिर्वाद देतायत. सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामया’ हा आमचा रोजचा पाठ आहे. आम्ही सगळ्यांना आशिर्वाद देतो. त्यात नारायण राणे आणि त्यांच्यासोबतचे लोक सुद्धा आहेत. आम्ही कधी शाप दिलाय?. जी धर्मशास्त्राची बाजू आहे, ती मांडण आमची जबाबदारी आहे. आम्ही फक्त आमच्या जबाबदारीच पालन करतोय” असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles