पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. विस्तारापूर्वीच राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यताच देसाई यांनी वर्तवल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे. हे नेते अजितदादा गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळेच कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. शंभूराज देसाई यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.