Tuesday, April 29, 2025

अहमदनगर…भल्या पहाटे महामार्गावर देवस्थानच्या पुजाऱ्याचा घाटात अपघाती मृत्यू

अहमदनगर- शनिवार असल्याने भल्या पहाटे नगरहून शनिशिंगणापूरला चाललेल्या श्री. शनैश्वर देवस्थानच्या पुरोहिताचा छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या इमामपूर घाटात हॉटेल लिलियम पार्क समोर अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२५) पहाटे घडली.

श्रीकांत मधुकर जोशी (वय ५०, रा. भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, मूळ रा. सोनई, ता. नेवासा) असे मयत पुरोहिताचे नाव आहे. जोशी हे मुळचे सोनई येथील रहिवासी असून गेल्या काही दिवसांपासून ते नगर शहरातील भिस्तबाग चौक परिसरात वास्तव्यास होते. ते शनिशिंगणापूरच्या श्री. शनैश्वर देवस्थानचे पुरोहित म्हणून काम पाहत होते. शनिवारी (दि.२५) शनिदेवाच्या पूजेसाठी ते पहाटे मोटारसायकल वर शनि शिंगणापूर कडे जात होते.

इमामपूर घाटात हॉटेल लिलियम पार्क समोर चुकीच्या दिशेने दोन वाहने भरधाव वेगात आली. अचानक समोरून आलेल्या वाहनांमुळे ते गोंधळून गेले व दोन्ही वाहनांच्या मध्ये चिरडले गेले. हा अपघात झाल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा अथर्व श्रीकांत जोशी याने उपचारासाठी पहाटे ४.५० वाजता नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

परंतु उपचारापूर्वीच ते मयत झाले असल्याचे मेडिकल ऑफिसर डॉ. पोळे यांनी घोषित केले. याबाबतची खबर जिल्हा रुग्णालयात नेमणुकीस असलेले सहाय्यक फौजदार मरकड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कळविली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पो.ना. संदीप पितळे हे करीत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles