Friday, February 23, 2024

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची पोलिसांकडून धिंड, video व्हायरल

शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी (१९ जानेवारी) एक मोठी कारवाई केली. मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलार याची पोलिसांनी राहत्या घरापासूनच धिंड काढली. शेलार हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लग्नाच्या वाढदिवशीच आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी शरद मोहोळवर भररस्त्यात गोळीबार केला होता. कोथरूडमधील सुतारदरामध्ये हा भयानक प्रकार घडला होता.

आपल्या मामाचा बदला घेण्यासाठी मुन्नाने मोहोळला संपवण्याचा कट रचला होता. त्याचबरोबर विठ्ठल शेलार यालाही मोहोळला संपवून गुन्हेगारी जगतात आपल्या दहशतीचे बीज रोवायचे होते. यासाठी आरोपींनी एक महिनाआधीच हत्येची प्लानिंग केली होती

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles