पुणे शहरात शुक्रवारी भरदिवसा गोळीबार झाला. चार हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या झाली. शरद मोहोळ याची हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचे नाव समोर आले आहे. साहिल केवळ सात दिवसांपूर्वीच त्याचा गँगमध्ये आला होता. त्यानंतर जमिनीच्या आणि पैशांच्या वादातून त्याने शरद मोहोळ याला संपवले. विशेष म्हणजे पाच जानेवारी रोजी शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसामुळे त्याच्या कार्यालावर गर्दी झाली होती. सर्वांच्या शुभेच्छी स्वीकारून देवदर्शनासाठी तो कार्यालयाच्या बाहेर पडला. त्यावेळी गर्दीतून पुढे आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळ्या चालवल्या. आता शरद मोहोळ याने ठेवलेले व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. त्यात म्हटले की, ‘ दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? ‘ गाण्यावर शरद मोहोळ याने पत्नी स्वाती मोहोळे हिला शुभेच्छा दिल्या आहेत. सा स्टेट्मध्ये दोघांचा फोटो पोस्ट करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या
गुंड शरद मोहोळने पोस्ट केलेले व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. ‘ दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? या गाण्यावर त्याने पत्नी स्वाती मोहोळे हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या पोस्टमध्ये दोघांचा फोटो पोस्ट करून लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शरद मोहोळ याने हत्येच्या काही वेळापूर्वी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते. त्यानंतर पुढच्या काही तासातच त्याच्यावर गोळीबार झाला.
लग्नाच्या वाढदिवशी शरद मोहोळचे पत्नीसाठी अनोख्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल
- Advertisement -