राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज गुरुवारी 12 डिसेंबर रोजी 85वा वाढदिवस आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेते म्हणून शरद पवारांनी राजकीय वर्तुळात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. भारतातील सर्वाधिक संसदीय कारकिर्द असलेले नेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते. गेल्या 50 पेक्षा जास्त काळ ते राजकारणात सक्रीय आहेत. शरद पवारांनी अनेक मंत्रिपदावर काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक मंत्रिपदावर काम केले आहे. तसेच शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक दिग्गज लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
आज (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा 84 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज दिल्लीतील 6 जनपथ येथे शरद पवार यांची अजित पवार यांनी सहकुटुंब भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. त्यांचं दर्शन घेतलं, चहा-पाणी झालं. सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या. परभणीला काल असे का घडले? राज्यात इतर ठिकाणी काय सुरू आहे? अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झाल्या. आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमचं अधिवेशन कधी आहे? अशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितल.