राजकीय भूकंपानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या कोण पॉवरफुल आहे, यावरुन चर्चा रंगली आहे. राजकीय अनुभव पणाला लागला आहे. शरद पवार यांनी 2020 मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे केवळ 32.73 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वर्ष 2014 पेक्षा 2020 मध्ये त्यांच्या संपत्तीत केवळ 60 लाख रुपयांची वाढ झाली. 32.73 कोटी संपत्तीत त्यांच्याकडे 25.21 कोटी चल आणि 7.72 कोटींची अचल संपत्ती आहे. अजित पवार यांनी 2019 मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील दिला आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण 75.48 कोटी रुपयांची चल-अचल संपत्ती आहे. काकांपेक्षा त्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. ते खऱ्या अर्थाने दादा ठरले आहेत. त्यांच्याकडे 23.75 कोटी रुपयांची चल आणि 51.75 कोटींची अचल संपत्ती आहे.