महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लागली असली तरी राज्यात पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. याविषयी सरकारशी चर्चा करणार आहे. मात्र जमीन कसायची सोडू नका, तुमची जमीन कसण्यासाठी नरेंद्र मोदी येणार नाहीत, असा मिश्किल टोला लगावत काहीही करून सरकार बदलायचं आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज इंदापूरमधील शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठी पवारांकडून दुबार पेरणीची सुरुवात करण्यात येत आहे. य़ावळे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, सरकारला अनुदान द्यावंच लागेल. नाही दिलं तर रस्त्यावर उतरावच लागेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी रस्त्यावर उतरायला तयार आहे. नाहीतर 4-५ महिने थांबा. कारण मला सरकार बदलायचे आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचे आहेत. त्यासाठी तुमची साथ हवी असं म्हणत त्यांनी लोकसभेला साथ दिल्याबद्दल आभार मानले.