Wednesday, April 17, 2024

आ.निलेश लंके यांच्यासह शरद पवार गटाच्या १० उमेदवारांची नावे निश्चित !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष राज्यात लोकसभेच्या १० जागा लढवणार असून बुधवारी पार पडलेल्या संसदीय कार्यकारणी समितीमध्ये उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली. शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाच्या सर्व उमेदवारांची घोषणा करणार आहेत.

सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत राज्यातील दहा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी तीन उमेदवारांच्या नावाची चर्चा करण्यात आली. त्यापैकी काही नावे निश्चित करण्यात आली. माढामध्ये धैर्यशील मोहीत पाटील, शिरुरमध्ये अमोल कोल्हे, बारामतीत सुप्रिया सुळे, दक्षिण अहमदनगरमध्ये निलेश लंके, भिवंडीमध्ये बाळयामामा म्हात्रे यांची नावे जवळपास निश्चित आहेत.

दिं डोरीमध्ये चिंतामणी गावित, भास्कर भगरे आणि हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नावावर चर्चा झाली. रावेरमध्ये शिरीष चौधरी, वर्ध्यात अमर काळे तर बीडमध्ये बजरंग सोनवणे आणि नरेंद्र काळे यांच्या नावावर चर्चा झाली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles