आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अनेक नेते पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे येत आहेत. कागलचे भाजपा नेते समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर इंदापूरचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलत असताना शरद पवारांनी सूचक विधान केले आहे. अनेक नेते पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र आम्ही स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेत आहोत. पक्षात येणाऱ्यांची उपयुक्तता, त्यांचे सामाजिक क्षेत्रातील काम, स्वच्छ कारभार पाहून नेत्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे असे जे नेते पक्षात येण्यास इच्छुक आहेत, त्या सर्वांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत, असे शरद पवार कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
शरद पवार ने कहा है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल होने वाले नए नेताओं का स्वागत किया जाएगा, लेकिन यह निर्णय उनके सामाजिक योगदान और कामकाज की साफ-सफाई पर आधारित होगा। 🌟 हाल ही में कई नेताओं ने पार्टी में शामिल होने की इच्छा जताई है, और पवार ने स्थानीय नेताओं के साथ चर्चा के बाद ही अंतिम फैसला लेने की बात की है। 🏛️🚀