Saturday, October 5, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे ऑक्टोबरमध्ये शिर्डीत राज्यव्यापी शिबिर, राष्ट्रवादीची ची रणनीती ठरणार!

जनतेतून शरद पवार यांच्या सभांना मोठा प्रतिसाददेखील मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राज्यव्यापी कार्यकर्ता शिबिर पुढील ऑक्टोबर महिन्यात शिर्डी येथे आयोजित केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे.

दरम्यान राजेंद्र फाळके पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर जिल्हा पातळीवर पहिलीच बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा कार्यकारिणीतील 90 पैकी 60 सदस्य उपस्थित होते. गैरहजर सदस्याच्या जागी आम्ही नव्याने नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिबिर शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांच्या भाषणावेळी अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने दोघे नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली होती. यानंतर अजित पवारांनी सत्ताधारी पक्षासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपद मिळवले. मात्र, खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेताला. मात्र, ते शरद पवारांच्या सभेच्या व्यासपीठावर न दिसल्याने ते नाराज असल्याच्याचर्चांना जोर आला आहे. आता पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यव्यापी शिबिरास कोल्हे येणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles