Wednesday, April 17, 2024

शरद पवारांचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? जयंत पाटील म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खिळखिळी करत जास्तीत जागा मिळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरही महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पश्चिम महाराष्ट्रातील एक बडा नेता भाजपच्या दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच पक्षांतर करणार असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. या चर्चेचा रोख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे होता. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
जयंत पाटील आणि माझी कुठेही, कसलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही. किंवा त्यांचं माझ्याशी काही बोलणं झालेलं नाही. या कदाचित कपोकल्पित बातम्या असतील. तरीही पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी आमच्याकडे कोणीही येऊ शकतं.असंही बावनकुळे म्हणाले. यानंतर आता जयंत पाटील यांनीच भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलंच आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येतं. आपण यावर नंतर बोलू.” असं म्हणत जयंत पाटील यांनी या सगळ्या गोष्टींवर मौन सोडलं आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी अवघ्या तीन ओळींत ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली तेव्हा जयंत पाटील रडले होते. शरद पवारांचे अत्यंत निष्ठावान आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांचा विषय त्यांनी अवघ्या तीन ओळींमध्ये संपवला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles