भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी पक्षात घेणार का? यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
शरद पवार आज बारामतीत आहेत. बारामतीमधील गोविंद बाग यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. इंदापूरमधून प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांचे कार्यकर्ते देखील गोविंदबागेत आले आहेत. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंदापूरमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हर्षवर्धन पाटलांबाबत निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता याच्यात तडजोड केली जाणार नाही आणि निवडून येण्याची शंकेची स्थिती इंदापूरमध्ये नाही. तुमचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवला पाहिजे. याबाबत मनात कोणतीच शंका नाही, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का? हर्षवर्धन पाटलांबाबत स्पष्टचं म्हणाले….
- Advertisement -