Sunday, December 8, 2024

राष्ट्रवादीचे मंत्री भेटल्यानंतर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका….

राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार व बंडखोर नेत्यांनी परस्परांना इशारे दिले. पक्षाध्यक्षपदी आपली निवड झाल्याचे कागदोपत्री दाखवीत पक्षाचे नाव व चिन्हावर अजित पवार यांनी दावा केला. या पार्श्वभूमीवर अजित पवार व प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाचे सर्व मंत्री व काही वरिष्ठ नेत्यांनी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्रात दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. पाया पडून पवारांचे आशीर्वाद घेतले आणि झाल्या प्रकाराबद्दल या सर्व नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पक्ष एकसंध ठेवून अधिक मजबूत करण्याकरिता आशीर्वाद देण्याची विनंती पटेल यांनी केली. जो प्रकार घडला त्यातून मार्ग काढण्याची विनंतीही सर्व नेत्यांनी केली. भेटीस आलेल्या सर्व बंडखोर नेत्यांना पवारांनी चहा पाजला. मात्र बंडखोर नेत्यांच्या विनंतीवर किंवा त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रफुल पटेल, छगन भुजबळ आदींनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांवर किंवा मांडलेल्या मतांवर शरद पवार यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.

या भेटीनंतर पवार यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘‘आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपला पाठींबा देऊ शकत नाही. आपली ती भूमिका नाही. यापुढेही पुरोगामी भूमिका घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे,’’ असा संदेश पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles