पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे २५ तारखेची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा देत सरकारला इशारा दिला आहे.