आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा देत मलाही शरद पवार म्हणतात, अशा शब्दात सज्जड दम दिला.
“मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली जात आहे. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तुम्ही आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही…” असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला.