बारामतीकरांनी फक्त माझं ऐकावं, असे आवाहन अजित पवार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले होते. काहींनी 38 व्या वर्षी वसंत दादांना मागे सारले तर मी ६० व्या वर्षी भूमिका घेतली असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला होता. आता अजित पवार यांच्या या वक्तव्यावर शरद पवार यांनीही उत्तर दिले आहे. पुण्यामध्ये भीमथडी यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
“मागील दहा- पंधरा वर्ष बारामती (Baramati) आणि परिसरातील स्थानिक कामे, निवडणूका यामध्ये माझे लक्ष नव्हते. याचा अर्थ मी कोणाला तरी काम करण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. देशात आणि राज्यात नेहमी नवीन लोकांना संधी देण्याचा मी प्रयत्न केला..” असे शरद पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांना टोला…
यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी वसंतदादांचे सरकार असताना केलेल्या बंडाचाही उल्लेख केला. “आम्ही कोणत्याही प्रकारचे बंड केले नव्हते. सर्वांनी बसून निर्णय घेतला होता. असे शरद पवार म्हणाले. तसेच आता जरी कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर त्याबाबत तक्रारीचं कारण नाही, असे म्हणत पक्षाची निर्मीती कशी झाली? संस्थापक कोण आहे?हे जगजाहीर आहे, त्यामुळे यावर जास्त बोलण्याची गरज नाही…” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.