Tuesday, June 25, 2024

शरद पवार यांनी या कृत्याचा निषेध म्हणून आ.आव्हाड यांची पक्षातून हाकलपट्टी करावी

आ.जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हाकलपट्टी करावी-ना.विखे पाटील

नगर दि.२९ प्रतिनिधी

भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणार्या आ.जितेंद्र आव्हाड यांचा महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. राजकारणासाठी डाॅ.आंबेडकराच्या नावाचा वापर करणार्या स्टंटबाज पुढार्यांची शरद पवार यांनी पक्षातून हाकलपट्टी करावी आशी मागणी त्यांनी केली.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, भावनेच्या भरात आपण काय करतो याचे भान राहीले नसलेल्या आ.जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय असून, डाॅ आंबेडकरी विचाराच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना या घटनेन दुखावल्या गेल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या सारख्या काही स्टंटबाज नेत्यांनीच राज्याचे सामाजिक राजकीय वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून सुरू केले आहेत.राजकारणात आता जनतेचे पाठबळ मिळत नसल्याने आशी कृत्य करून प्रसिध्दी मिळविण्याचा हव्यास करताना आ.आव्हाड यांना भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुध्दा पुरली नाही हे अतिशय खेदजनक असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

जेष्ठ नेते शरद पवार यांनी या कृत्याचा निषेध म्हणून आ.आव्हाड यांची तातडीने पक्षातून हाकलपटी केली पाहीजे आशी मागणी करून, भाररत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आता कोणामुळे धोका आहे हे चेहरे सुध्दा आज या घटनेमुळे राज्याला समजले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles