शरद पवार यांना ८० ते ८५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील, यात शंकाच नाही. जे सोडून गेले, त्यांना जाऊ द्या.. आपण नवं नेतृत्व तयार करू… असे म्हणत शरद पवार कामाला लागले. त्यांनी आपल्यासाठी सकारात्मक असलेल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाव्या ५२ मतदारसंघातील उमेदवारांबाबत जाणून घेऊयात.. अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सध्या खालील नावे आघाडीवर आणि चर्चेत आहेत.
शरद पवार यांचे संभाव्य उमेदवार –
बारामती – युगेंद्र पवार
इंदापूर – हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने,अप्पासाहेब जगदाळे
दौंड – आप्पासाहेब पवार, नावदेव ताकवणे
खडकवासला – सचिन दोडके
हडपसर – प्रशांत जगताप, योगेश ससाणे
भोसरी – विलास लांडे, अजित गव्हाणे
आंबेगाव – देवदत्त निकम
शिरुर हवेली – आमदार अशोक पवार
आळंदी – अतुल देशमुख
जुन्नर – शरद लेंडे, अनंतराव चौगुले, तुषार थोरात, मोहित ढमाले
पुरंदर – संभाजीराव झेंडे
कर्जत-जामखेड – रोहित पवार
राहुरी – प्राजक्त तनपुरे
पारनेर – राणी लंके
शेवगाव-पाथर्डी – प्रतापराव ढाकणे
अकोले – अमित भांगरे
श्रीगोंदा – राहुल जगताप
कोपरगाव – विवेक कोल्हे
अहमदनगर शहर – अभिषेक कळमकर, डॉ. आठरे
मोहोळ – राजू खरे, अभिजित ढोबळे, रमेश कदम, संजय क्षीरसागर
सांगोला -दीपक साळुंके, बाबासाहेब देशमुख, दत्तात्रय सावंत
बार्शी – दिलीप सोपल, प्रभाताई झाडबुके
माढा – रणजित शिंदे, रणजित मोहिते
माळशिरस – उत्तमराव जानकर
करमाळा – नारायण पाटील
पंढरपूर – भागीरथ भालके, अनिल सावंत, प्रशांत परिचारक
फलटण – दिगंबर आगवणे, अभय वाघमारे, रमेश आढाव
पाटण – सत्यजित पाटणकर
माण-खटाव – प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप
कोरेगाव – शशिंकात शिंदे
सातारा जावळी – दीपक पवार, शफीक शेख
वाई खंडाळा – मदनदादा भोसले (प्रवेश बाकी), यशराज भोसले
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
कागल – समरजीत घाटगे
चंदगड – नंदिनी बाभुळकर
राधानगरी-भुदरगड – केपी पाटील, एवाय पाटील
वडगाव शेरी – बापू पठारे
वाळवा-इस्लामपूर – जयंत पाटील
तासगाव – रोहित पाटील
शिराळा – मानसिंह नाईक
आष्टी-पाटोदा – राम खाडे
परळी – राजाभाऊ फड, बबन गीते, फुलचंद कराड
बीड – संदीप क्षीरसागर
केज – पृथ्वीराज साठे, नवनाथ शिंदे
माजलगाव – नारायण डक, मनोहर डाके
अहमदपूर – विनायकराव पाटील
परांडा – राहुल मोटे
घनसावंगी – राजेश टोपे
काटोल – अनिल देशमुख
येवला – अमृता पवार (पक्षप्रवेश बाकी)
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मावळ – बाळा बेगडेंना संधी दिली जाऊ शकते
बदनापूर, जिंतूर,वसमत, किनवट, हिंगणा, मोरगाव, अहेरी, कारंजा, हिंगनघाट, नाशिक पश्चिम, दिंडोरी,पुसद, नाशिक मध्य, मुक्ताईनगर, अमळनेर, देवळाईनगर या मतदारसंघातही शरद पवार यांना विजय मिळू शकतो, असं बोललं जातेय. त्याशिवाय कोकण आणि मुंबईमध्येही शरद पवारांना काही जागांवर यश मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जातोय.