Saturday, May 18, 2024

पाच वर्षांपूर्वी माझी चूक झाली, माफी मागतो, शरद पवारांचं जाहीर विधान

अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर आदी दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत टीका केली. भाषणात त्यांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका केली. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी आपली चूक झाली, असं थेट विधान केलं आहे.
मी इथे आलोय तुम्हाला एक गोष्ट सांगण्यासाठी. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना अमरावतीकरांनी खासदार केलं. पाच वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली. ही चूक आता पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे, असं शरद पवार म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles