लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. प्रचार सभांना वेग आलेला असताना प्रचाराच्या नियोजनासाठी जोरात बैठकाही होत आहेत. यादरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हीडिओ भाजपाकडून व्हायरल केला जातोय.शुक्रवारी ३ मे रोजी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर भाजपाच्या अनेक नेत्यांकडून हा व्हीडिओ व्हायरल केला जातोय. या व्हीडिओमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काही पदाधिकारी दिसत आहेत. शरद पवार एका बैठकीत असून उद्धव ठाकरे उभे आहेत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जाण्याची सूचना केली. तर, त्यांच्या सूचनेचं पालन करत मी बाजूला आहे, जरा फ्रेश होऊन येतो, असं ठाकरे म्हणत आहेत
Sharad Pawar politely telling Uddhav Thavkeray to get out as he is busy. pic.twitter.com/8QKcLqp5li
— Jiten Gajaria -Modi Ka Parivar (@jitengajaria) May 3, 2024