Sunday, May 19, 2024

शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, प्रकृती अस्वस्थपणामुळे सर्व कार्यक्रम रद्द

राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारासाठी जात आहेत. शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या

शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांचे कुटुंबिय श्रीनिवास पवार, रणजित पवार यांनी शरद पवार यांची मोदी बागेत जावून भेट घेतली आहे. बारामतीत उद्या मतदान आहे. शरद पवार कुटुंबियांकडून सदस्यांकडून यंत्रणेचा आढावा घेत आहेत. शरद पवार यांना डॉक्टरांनी दोन दिवस भाषण करु नका, असा सल्ला दिला आहे. त्यानंतर आता कुटुंबिय शरद पवार यांची काळजी घेत आहेत. तसेच आता मतदान आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असला तरी शरद पवार मतदानाचा आढावा आपल्या कुटुंबियांकडून घेत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles