महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींवर आज (दि.१७ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी अजित पवार पुन्हा आले तर त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी सूचक विधान केलं.
अजित पवार पुन्हा आले तर त्यांना घरात घेणार का? पक्षात जागा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी यावर सूचक उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, “घरात सर्वांना जागा आहे. पण पक्षात जागा आहे की नाही? याबाबत व्यक्तिगत मी निर्णय घेणार नाही. माझे सर्व सहकारी संघर्षाच्या काळामध्ये माझ्याबरोबर मजबुतीने उभे राहिले. त्यांना पहिल्यांदा विचारेल”, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं.