मतदार संघामध्ये जे कामे अर्धवट आहेत ती पूर्ण न करता त्या कामाची उद्घाटने व हारतुरे नारळ घेणे आमदारांनी बंद करावीत. जर कामच पूर्ण नाही तर हार नारळ कुणाचे व कशासाठी घेताय. तुम्हाला खरंच जर जनतेचा कळवळा असता तर भगवानगड पाणी योजना पूर्ण केली असती आणि पूर्ण करून मगच सत्कार घ्यायचे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केले. माणिकदौंडी येथे आज दि.(०५) रोजी कार्यकर्त्याचा मोठा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ह.भ.प.श्रीधर महाराज शिंदे हे होते. या कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, रामभाऊ साळवे, सरपंच मिठूभाऊ चितळे, सरपंच विकास राठोड, विष्णू कोठे, दिगंबर चितळे, सुरेशराव पवार, फकीर मोहम्मद पठाण, जलीलभाई पठाण, बाळासाहेब आंधळे, सुरेश चौधरी, फैयाज पठाण, अशोक ढाकणे, प्रभाकर मार्कंडे, वैभव पुरनाळे, बिलालभाई पठाण, समीर आठरे, रज्जाकभाई शेख, अमोल शेळके, भाऊसाहेब सातपुते, भाऊसाहेब मडके, आबासाहेब बेडके, शिवाजी मडके, फकीर मोहम्मद पठाण, अकबर पठाण, मानसिंग सांगळे, लक्ष्मण राठोड, रोहित तोडकर, अण्णा फुंदे, सिराजभाई शेख, जगन्नाथ भापकर, देवराव दारकुंडे, विनायक देशमुख, सुनील शेळके, रवींद्र नवगिरे, दिलीप मोहिते इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सौ.काकडे म्हणाल्या की, सध्या फक्त नारळ फोडणेचे कार्यक्रम लोकप्रधिनीच्या माध्यमातून चालू आहे.
मतदारसंघातील कोणत्याच गावात ठोस कामे नाहीत, रस्ते नाहीत, पिण्यास पाणी नाही मग यांनी कसला विकास केला ? मूलभूत गरजा पासून त्यांनी तालुका वंचित ठेवला आहे. सत्ता कशासाठी असते गोरगरिबांची सेवा व्रत तुम्ही सत्तेच्या माध्यमातून घ्यायचे असते. परंतु तुम्ही फक्त स्वतःचे, संस्था बगलबच्चे मोठे केले. हे साखरसम्राट एकच आहेत त्यांची अजूनही मिलीभगत आहे. त्यांना फक्त मी सत्तेत नकोय त्यासाठी त्यांच्या बैठका होत आहेत. कारण गोरगरीब जनता आता त्यांची राहिली नाही. माझ्याकडे कोणताही मोठा पुढारी नाही चिल्लर माणसं माझ्याकडे आहेत. परंतु चिल्लरचाच आवाज यावेळी मतदारसंघात होणार आहे. माझी लहान लहान माणसं आता पेटून उठलेले आहेत. मला या माणिकदौंडीमध्ये पोलीस स्टेशन, शैक्षणिक सुविधा, मुलांसाठी अकॅडमी, सुसज्ज ग्रंथालय , पिण्याचे स्वच्छ पाणी , रस्ते आदी मूलभूत सुविधा द्यावयाच्या आहेत. मला गरिबांची हिताची कामे करायची आहेत म्हणून मला यावेळी आमदारकीची संधी द्या. इतक्या दिवस तुम्ही यांनाच मत दिली आहेत एक वेळेस बदल करून पहा. तुमच्या लहान लहान समस्या असतात त्या सोडविल. मतदारसंघात रस्ते विज पाणी या सुविधा देईल असेही सौ काकडे म्हणाल्या. तसेच यावेळी अमोल शेळके यांनी दोन लाख व सतिष आठरे यांनी दीड लाख रुपयांचा निधी सौ काकडे यांना निवडणुकीसाठी निवडणूक निधी म्हणून दिला. यावेळी ॲड. शिवाजीराव काकडे म्हणाले की, प्रस्थापित आमदार या तुम्हाला काहीही देऊ शकत नाहीत.
त्यांनी माझे 2014 चे तिकीट अचानक पक्षात प्रवेश नसताना माझ्या तिकिटावर दरोडा टाकला. या देणाऱ्यापैकी नाहीत या दरोडा टाकून लुबाडणाऱ्या आहेत. यांना नऊ गावांची योजना १३ गावांची झाली हेही माहीत नाही तसे त्या गावांची नावे निटनेटकी माहीत नाहीत. संघर्ष आम्ही शेतकऱ्यांनी केला व आमदार पत्र हातात धरून फोटो काढून घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत. आम्ही जो पाणी संघर्ष केला तो त्या १३ गावातील शेतकऱ्यांना माहित आहे. मग कसला खोटा श्रेय घेण्याचा प्रयत्न करता ?माझ्या कुटुंबाला सुद्धा या प्रस्थापितांनी सतत दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील विकास व विकासामध्ये झालेली पीछेहाट आम्ही भरून काढू. ही संधी आहे नाहीतर आमच्या सारखा संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता परत तयार होणार नाही. यांच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही आमदार खासदार करणार का ? दहिगाववाल्यांना शरद पवारांनी सर्व सत्ता ,पदे दिली तो पठठ्या संकटकाळात त्यांनाही सोडून पळून गेला. ज्यांनी इतक दिल तरी तो त्यांचा झाला नाही तो तुमचा आमचा काय होईल? आता बिळातून १० वर्षानंतर बाहेर आलाय व मला आमदार करा अशी भीक मागतोय असे ॲड काकडे म्हणाले. यावेळी अनिल महाराज मुंडे रमेश महाराज राठोड विनायक देशमुख जगन्नाथ भापकर यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सातपुते यांनी केले सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी केले तर आभार जगन्नाथ बोडखे यांनी मानले