शेवगाव-आपल्या मतदारसंघाचे आजूबाजूचे तालुक्याचा विकास झाला. आलटून पलटून सत्ता भोगणारे हे प्रस्थापित आजी माजी आमदारांना तालुक्यातील जनतेला साधे पिण्याचे पाणी नियमित देता आले नाही आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या हितासाठी यांना आता आमदारकी पाहिजे आहे यांना आता तरी ओळखा व यांना त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन सौ.हर्षदा काकडे यांनी केले.
आज बोधेगाव येथे विधानसभा तयारीपूर्व ‘संकल्प विजयाचा’ हा कार्यकर्त्यांचा महामेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमास सिनेअभिनेते भाऊसाहेब शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, सुरेश कुटे, अमोल शेळके, अंबर बर्डे, जलील पठाण, नरेश वडते, सतीश आठरे, गणेश वायकर, लक्ष्मण राठोड, नवनाथ फंदे, सुरेश चौधरी, बापूसाहेब कोलते, राजेंद्र सोनटक्के, अशोक पातकळ, भागवत भोसले, शिवाजीराव तेलोरे, पोपट क्षीरसागर, दशरथ फाटके, देविदास गिऱ्हे, जालिंदर कापसे, वैभव पुरनाळे, नगराध्यक्ष विनोद मोहिते, सचिन आधाट, देवराव दारकुंडे, अस्लम शेख, ॲड.संजय काकडे, विश्वास ढाकणे, एकनाथ ढाकणे, लहू झिरपे, गणपत फलके, अशोक डोईफोडे, राघुजी शिंदे, आबासाहेब काकडे, भारत लांडे, नारायण गर्जे, सुनील गायके, बाळासाहेब काटे, जालिंदर बेळगे, अशोक ढाकणे, लक्ष्मण गवळी, माणिक गर्जे आदि प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांचे प्रस्थापितांविरुद्ध घनाघाती भाषण झाले. त्या म्हणाल्या की, या प्रस्थापितांनी २५-२५ वर्ष आलटून पालटून सत्ता भोगल्या व स्वतःचे भले करून घेतले. टक्केवारी शिवाय हे कोणाचे कामही करत नाहीत. टक्केवारीच्या भानगडीत शेवगाव नगर परिषदेच्या पाणी योजना, एमआयडीसी या मूलभूत प्रश्नावर यांनी खोडा घातला. जायकवाडी धरणात शेवगाव तालुक्याच्या जमिनी गेल्या आणि पाणी मराठवाड्याला चाललंय याकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. मतदार संघ विकासापासून वंचित ठेवण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी केले आहे. अशा प्रवृत्तीची ही साखर सम्राटांची टोळी निवडणूक आली की बिळातून बाहेर येऊन देव देवतांच्या नावाने पायपडून आमच्याकडे लक्ष द्या असं म्हणत आहेत. त्यांची ही पद्धत जनतेने ओळखावी. या टक्केखोर प्रस्थापितांना आता जनतेने या निवडणुकीतून हद्दपार करावे. हे खरे या तालुक्याचे भूमिपुत्र ही नाहीत. हे राहायला नगरला आणि शेवगावचे राजकारण करतात. आणि जनतेला गाजर दाखवून निवडून येतात. असे किती दिवस यांना तुम्ही आमदार करणार. आता चुकलात तर यांच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा मतदान करावे लागेल. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्व सगेसोयरे वेगवेगळ्या पक्षात तंबू ठोकून बसलेले आहेत. आमच्यासारख्यांना संधी मिळू नये ही यांची भावना आहे परंतु आता गोरगरिबांच्या जीवावर मी लढवणार आहे. आणि मला जर तुम्ही संधी दिली तर पुढील पन्नास वर्षे तुम्ही आमचे नाव घ्याल एवढी विकासकामे मतदारसंघात करून दाखवणार असे ही सौ.काकडे यावेळी बोलतांना म्हणाल्या.
त्यावेळी बोलताना ॲड.काकडे यांनी ताजनापूर मधील 17 गावांना फक्त आम्हीच लढा देऊन पाणी आणलं. या प्रस्थापितांनी एक अर्जही यासाठी कधी दिला नाही. यांच्या डोक्यात दुष्काळी गावांना पाणी देण्याचे कधी मनातही आलं नाही. या योजनेचे यश हे फक्त आमच्या संघटनेचे आहे. या लढ्यासाठी प्रपंचातील पदर खर्चाने आंदोलने केली, आताही १३ गावांसाठी पाणी देण्याचे नियोजन झाले आहे. आखेगाव वरुर योजनेतील १३ गावांच्या योजनेसाठी १२५ कोटींची तरतूद होत आहे.
सिनेअभिनेते भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, गोरगरिबांची लूट या मतदारसंघांमध्ये झालेली दिसते. सौ.हर्षदा काकडे या सक्षम महिला नेतृत्व आहेत. यांना जर आपण संधी दिली तर तुमचा विकास कोणीही रोखवू शकणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत पक्ष जातपात धर्म न पाहता आपल्या कामाच्या हर्षदा काकडे यांना विधानसभेत पाठवा असे ते त्यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी विनायक देशमुख, हरी फाटे, भाऊसाहेब मडके, विश्वास ढाकणे, भाऊसाहेब सातपुते, जगन्नाथ गावडे अशोक पातकळ, लक्ष्मण गवळी यांची भाषणे झाली.
सौ. हर्षदा काकडे यांचे सभेसाठी आम्ही सर्व टपरीधारक व्यावसायिक यांनी स्वयंप्रेरणेने दुकानाचे व्यत्यय सभेमध्ये येऊ नये म्हणून स्वयंस्फर्तीने आम्ही सर्वांनी आमची दुकाने तीन दिवस काढून घेतली. आसिफ मनियार, आयुब शेख, समीर पठाण, ग्रामस्थ व्यावसायिक, बोधेगाव.
शेवगाव तालुक्यातील आजी माजीनां त्यांची जागा दाखवण्याची हिच ती वेळ ; हर्षदा काकडे
- Advertisement -