Friday, February 23, 2024

बनावट करारनामा करून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ५४ लाख रुपये लाटले, नगर जिल्ह्यातील डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

*वैद्यकीय व्यवसायाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून साई पुष्प हॉस्पिटल डॉक्टर प्रल्हाद पाटील यांनी केली शासनाची लाखो रुपयांची फसवणूक शेवगाव पोलीस स्टेशनला याबाबत अहमदनगरच्या डॉक्टर दांपत्याने केला गुन्हा दाखल*

*याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शेवगाव पोस्टे गुरनं 109/2024 भा.द.वि. कलम420, 467, 468, 471 प्रमाणे
फिर्यादीचे नाव = सतिष सुधाकर अंके वय 40 वर्षे धंदा- डॉक्टर रा. प्लॉट नं 52, आनंदनगर गुलमोहर रोड सावेडी यांनी शेवगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील पैठण रोड भागातील आरोपी *डॉ.प्रल्हाद गवाजीनाथ पाटील* साईपुष्प हॉस्पीटल निळकंठ नगर शेवगांव ता शेवगाव जि. अहमदनगर येथे
*सन 2020 में दि 05/06/2023 चे दरम्यानवरील वेळी व ठिकाणी यातील आरोपी डॉ. पाटील याने यातील फिर्यादी डॉ. सतीश सुधाकर अंके* यांच्या व्यावसायिक पदाचा गैरफायदा घेवुन आरोपीकडे महात्मा ज्योतीबा फुले जन आरं अंतर्गत रुग्णावर उपचार करणेकामी आवश्यक पदवी नसताना *फिर्यादीचे नावावर बनावट करारनामा व नोटरी तयार करुन घेवुन त्यावर फिर्यादीची खोट्या सह्या करुन फिर्यादीचे शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रांचा बेकायदेशीररित्या फि वसूल करून* संमतीशिवाय वापर करुन *महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत साई पुष्प रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करुन शासनाकडुन 54,50,500/-रुपये रक्कम प्राप्त कर घेवुन* फिर्यादीची व शासनाची फसवणुक केली वगैरे मजकुराचे फिवरुन गुन्हा रां दाखल पुढील तजवीज स.पो.नि. प्रशांत कंडारे नेम शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles