पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मोदी यांच्या हस्ते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर मोदी एका शेतकरी मेळाव्याला ही संबोधित करणार आहेत.या सभेला ग्रामस्थांना आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण नगरमधील एका गावातील नागरिकांनी सभेसाठी पाठवलेल्या बसेस रिकाम्याच पाठवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील ग्रामस्थांनी ही वाहने परत पाठवली आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या गावात पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच विखे कुटुंबीयांविरोधात मठाचीवाडी येथील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्याचा फटका मोदी यांच्या सभेला बसताना दिसत आहे.
नगर जिल्ह्यात मराठा आंदोलक आक्रमक, पंतप्रधानांच्या सभेला बस रिकाम्या पाठवल्या…
- Advertisement -