Sunday, July 21, 2024

शेवगाव पाथर्डी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांना न्याय मिळावा…आ.राजळेंचे मंत्र्यांना निवेदन…

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांना दाखले व प्रकल्पबाधित शेतकरी जमीन वाटप झाले पाहिजे, या मागणीसाठी आमदार मोनिका राजळे यांनी महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसनमंत्री ना. अनिल पाटील यांची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह भेट घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यांच्या कानावर घातल्या. या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी विस्तृत चर्चा झाली.

या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न व इतर समस्यांविषयी मी विधानसभेत देखील आवाज उठवला होता. लवकरात लवकर हे प्रकरण निकाली काढण्याचा शब्द यावेळी मंत्रीमहोदयांनी दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles