माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आज (गुरुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे आहेत. चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. नगर जिल्हा सहकारी बँकेतील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला होता. त्यामुळे ते नाराज होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात आहेत. तर चंद्रशेखर घुले यांनी आज अजित पवार यांना भेटल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदार संघातील राजकीय गणिते बदलणारं….चंद्रशेखर घुले पाटलांनी !
- Advertisement -