Friday, March 28, 2025

2014 पासून आम्ही लाडक्या बहिणीला सांभाळले… आता त्यांनी थांबावे…आ. राजळेंना पक्षातूनच विरोध…

नात्यागोत्याच्या राजकारणामुळे मतदारसंघ बुडवण्याचे काम सुरू असून लोकप्रतिनिधींनी भाजप कार्यकर्तेऐवजी बगलबच्चांना पोसण्याच काम सुरू आहे. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदारसंघातून आवाज उठला असून आता बदल केल्याशिवाय पर्याय नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याची दखल पक्षालाही घ्यावी लागेल, अन्यथा भाजपची ही जागा हातातून जाईल असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात दिली. मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा शेवगाव येथे झाला.

अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य होते. यावेळी मुंडे यांनी आ. मोनिका राजळे यांच्यावर नाव न घेता टीका केली. लोकप्रतिनिधींच्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. ज्यांची गल्लीत निवडून येण्याची ऐपत नाही अशांना तालुका सांभाळायला दिला आहे. त्यांना विरोध करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. असे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. त्यामुळे तुम्ही परत आमदार होणार नाहीत. गावच्या सरपंचापासून जिल्हा परिषद, कारखाना, मार्केट कमिटी व आमदारकी अशी सर्व पदे तुम्हाला घरातच पाहिजेत. शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. परंतु 2014 सालापासून आम्ही लाडक्या बहिणीला सांभाळले. आता त्यांनी थांबावे व आम्हाला आशीर्वाद द्यावा असे ते म्हणाले. आम्ही भाजप विरोधात लढणार नाहीत असे ते सांगतात.

मात्र भाजप सरकारकडून कोटी रुपये कारखान्यांसाठी आणले ते यांना चालतात का अशा शब्दात मुंडे यांनी घुले यांच्यावर टीका केली. भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले, 25 ते 30 वर्षांपासून भाजपचे काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मतदार संघातील घराणेशाहीने 50 वर्ष जनतेला फसवले पक्षाने आदेश दिला तर उमेदवारी करू अन्यथा अपक्ष उभे राहण्याचेही तयारी आहे. यावेळी बाळासाहेब सोनवणे, संजय मरकड, सतीश मगर, आत्माराम कुंडकर, शब्बीर शेख, संजय टाकळकर, विलास फाटके, रमेश कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी अमोल सागडे, नगरसेवक अजय भारस्कर, अंकुश कुसळकर विकास फलके, दिगंबर काथवटे, गणेश गर्गे, भूषण देशमुख, भीमराव फुंदे, उदय मुंडे, सालार शेख, शितल केदार उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब कोळगे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी तर आभार गणेश कराड यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles