Wednesday, April 30, 2025

शेवगाव तालुक्यातील सशस्त्र दरोड्यातील आरोपी जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चापडगांव व आखेगांव ता. शेवगांव येथे सशस्त्र दरोडा घालणारे 05 आरोपी 2,49,000/-रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद,

स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची धडाकेबाज कारवाई.
-प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 21/12/2023 रोजी फिर्यादी कमलेश सुभाष वाल्हेकर वय – 23 वर्षे, रा. चापडगांव शिवार, चापडगांव, ता. शेवगांव जि. अहमदनगर हे त्यांचे कुटुंबासह घरामध्ये झोपलेले असतांना रात्री 01.00 ते 02.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी तसेच त्यांचे कुटुंबियांना चाकुचा धाक दाखवुन मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटारसायकल, टी.व्ही., गॅस शेगडी, 6 शेळ्या असा एकुण 1,08,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता. तसेच दिनांक 24/12/2023 रोजी फिर्यादी अभय राधाकिसन पायघन वय 24 वर्षे, रा. आखेगांव, ता. शेवगांव यांचे घरामध्ये रात्री 01.00 वा. चे सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करुन फिर्यादीची आई मंगल पायघन हिचे डोळयाच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच रामकिसन पांडु काटे यांना मारहाण करुन 50,000/- रुपये रोख रक्कम दरोडा टाकुन चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 1172/2023 भादवि कलम 392, 452, 504, 506, 34 व गु.र.नं. 1183/2023 भादवि कलम 394, 452, 457, 380, 506, 511, 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चासफौ. उमाकांत गावडे, चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन विशेष पथके नेमुन आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या व पथके तात्काळ रवाना केली.
विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटना ठिकाणी जावुन बारकाईने पहाणी करुन शेवगांव तालुक्यामध्ये आरोपींची माहिती काढत असतांना पोनि श्री दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा सदरचा गुन्हा हा दिपक गौतम पवार रा. टाकळीअंबड, ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला असुन ते सध्या त्यांचे टाकळीअंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ टाकळीअंबड, ता. पैठण येथे जावुन दिपक गौतम पवार याचे घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला असता सदर पालांमधुन काही इसम जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळुन गेले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जावुन लपुन बसलेल्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गांव विचारता त्यांनी त्यांचे नावे 1) दिपक गौतम पवार वय 35 वर्षे, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि.

छ. संभाजीनगर, 2) नितीन मिसऱ्या चव्हाण वय 20 वर्षे, रा. जोडमालेगांव, ता. गेवराई, जि. बीड, 3) गोविंद गौतम पवार वय 20 वर्षे, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 4) किशोर दस्तगीर पवार वय 19 वर्षे, रा. हिरडपुरी, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 5) राजेश दिलीप भोसले वय 30 वर्षे, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करता त्यांनी त्यांची इतर फरार साथीदार नामे 6) सोन्या मजल्या भोसले रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 7) उद्या मजल्या भोसले रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 8) संभाजी गौतम पवार रा. सदर, 9) अभिषेक भैया चव्हाण रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, 10) संभाजी गौतम पवार याचा मित्र नांव गांव माहित नाही यांचेसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे
मिळुन आलेल्या आरोपींची अंगझडती तसेच त्यांचे घराची व पालाची झडती घेता त्यांचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी, मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकुण 2,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles