Friday, December 1, 2023

शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर, दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत बापलेकीचा मृत्यू

शेवगाव-गेवराई राज्य मार्गावरील चापडगाव शिवारात दोन मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत बापलेकीचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी मंगळवारी (दि.24) ऐन दसर्‍याच्या दिवशी घडली. यात आखेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व त्यांच्या मुलीचा सामावेश आहे. अशोक विक्रम उगले (40) व त्यांची मुलगी गौरवी उर्फ अवणी अशोक उगले (10, रा. बेलगाव, ता. शेवगाव) अशी या अपघातातील मृत्यू झालेल्यांची नावे ओहत. ऐन दसर्‍याच्या दिवशी घडलेल्या या अपघाताच्या घटनेमुळे परिसरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.

शेवगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बेलगाव येथे उगले परिवाराने गावात देवीचे मंदिर बांधले असून मंगळवारी दसर्‍याचे दिवशी देवीच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम आटोपून मयत आशोक उगले हे आपली पत्नी, मुलगा व मुलगी यांचेसह मोटरसायकलवरून शेवगाव-गेवराई महामार्गाने शेवगावकडे निघाले होते. चापडगाव शिवारात समोरून भरधाव येणार्‍या मोटरसायकलने त्यांच्या मोटरसायकलला जोरात धडक दिली. त्यात अशोक उगले व मुलगी गौरी हे दोघे गंभीर जखमी झाले तर पत्नी व मुलगा यांना देखील जखमी झाले होते.

त्यांना अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असतांना अशोक उगले यांचा उपचार सुरु असतांना मंगळवारी रात्री 11 चे सुमारास तर मुलगी गौरी हीचा आज बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मृत्यू झाला. सायंकाळी सहाचे सुमारास त्यांचे पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: