Tuesday, February 18, 2025

कोट्यवधी रूपये लाटून शेअर ट्रेडर्स पसार…शेवगाव, पाथर्डीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त

शेअर्स मार्केटमधून गुंतवणूक दुप्पट करून देती किंवा महिन्याने त्याचा मोठा परतावा देण्याचे आमिष देऊन शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात अनेकांची फसवणूक झाली आहे. शेअर्स मार्केटच्या अभ्यास करून त्यासाठी सावज शोधून त्याच्यावर डाव टाकून कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याचं उघड झाला आहे. यामध्ये जवळपास 300 ते 400 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आले आहे. गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये घेऊन ट्रेडर्सनी धूम ठोकली आहे, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून तालुक्यातील व्यवहारही ठप्प झाले आहे. काही महिन्यापासून या परिसरात शेअर्स मार्केटच्या नावाखाली टेंडर्स यांनी धुमाकूळ घातला होताय या परिषद शेअर्स मार्केटचे हब म्हणून नाव रूपाला हे आले होते परताव्याच्या अमिषा पोटी येथील शेत कामगार, वीट कामगार, शेतकरी, शिक्षक अशा अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी या शेअर्स मार्केटमध्ये लावली. गुंतवणूकदाराकडून परताव्याचे आमिष दाखवून या ट्रेडर्सनी लाखो रुपयाचे गुंतवणूक घेत दर महिना 7 ते 20 टक्के परतावा देण्याचा सांगितले होते. एक दोन महिने परताव्याचे पैसे दिल्यानंतर गुंतवणुकीची रक्कम घेऊन हे ट्रेडर्स फरार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून दखल घेतली जात नसून पळून गेलेल्या ट्रेडर्सला अभय देत असल्याचा आरोप करत काही नागरिकांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles