अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. तिचा नवरा राज कुंद्रा हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९ जुलै २०२१ रोजी त्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती.
पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यापासून राज कुंद्रा सतत मास्क घालून बाहेर फिरत असतो. गेल्या दोन वर्षांपासून सतत मास्क घालून फिरत असल्याने त्याच्यावर अनेक लोक टीका करतात. शिल्पा शेट्टी आणि त्याच्या मुलांबरोबर फिरतानादेखील तो मास्क घालत असल्याचं पाहायला मिळतं.
शिल्पा आणि राज कुंद्राचा हा व्हिडओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता आहे. पापाराझींनी मागणी केल्यावर शिल्पाने यात शेवटी तिचा चेहरा दाखवला. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “चुकीची कामं केल्यावर तोंड लपवण्याची वेळ येते”, “आता शिल्पा शेट्टी सुद्धा नवऱ्यासारखी वागतेय”,