सध्या नवरात्र उत्सव सुरू असून, जवळपास सात-आठ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके आपल्या मतदारसंघातील नागरिकांना जिल्ह्यातील मोहटादेवी दर्शनाचा लाभ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देत आले आहेत. यंदाच्या उत्सवात याच कार्यक्रमात व्यग्र असताना भाजप आमदार राम शिंदे यांनी आमदार लंके यांची भेट घेत त्यांच्या कामाचे कौतुक करत आई मोहटादेवी लंके यांच्या मनोकामना पूर्ण करोत, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
नगर दक्षिण लोकसभा 2024 निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासमोर मविआपेक्षा मोठे आव्हान हे महायुतीमधूनच पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी फार पूर्वीच सुरू केलेली आहे, तर दुसरीकडे भाजप आमदार राम शिंदे यांनीही पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे.