शिंदे गट आणि भाजपला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सरकार स्थापनेसाठीच निमंत्रण नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, “महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. याबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मिळाली आहे.”
राज्यात सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याल्या दाव्यामुळे राज्यातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.