Thursday, September 19, 2024

शिर्डी विमानतळाला जंगम मालमत्ता जप्तीची नोटीस…

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतीची कराची रक्कम सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनी, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, करबाकी भरण्याबाबत सातत्याने दिलेली पत्रे, फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, 24 मार्च 2024 रोजी हुकूम नोटीस, 129 प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव देऊनही कर भरणा केलेला नाही. 8 कोटी 30 लाख रुपये कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयास जमा होत नसल्याने गावच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीकरिता जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्यात येत वॉरंटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles