Friday, June 14, 2024

नगर दक्षिणेत सुजय विखेच विजयी होतील… पंकजा मुंडे यांना विश्वास…

राहाता : लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचा मला फायदा होईल. साईंच्या कृपेने निकाल देखील सकारात्मक येईल, अशी अपेक्षा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त करीत कांद्याच्या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी आज शुक्रवारी साई दरबारी आई प्रज्ञा मुंडे यांच्या समवेत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी जि. प. च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे उपस्थित होत्या. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या संदेशाचे पालन केले तर जीवनात अडचणी येत नाहीत. आज मी आईबरोबर या ठिकाणी २०१४ नंतर प्रथमच आईच्या आग्रहामुळे देवदर्शन करण्यासाठी बाहेर पडले आहे. सत्तर दिवस प्रचारात गेले. देशहिताचे निर्णय घेणारे लोक यात आले पाहिजेत. हा विचार जनतेने केला असेल तर नक्कीच त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील.

आतापर्यंत जे पाहिले नाही ते या निवडणुकीत पाहायला मिळाले. असे त्यांनी स्पष्ट केले. प्रचार सगळ्यांनीच केलेला असतो, मात्र नगरमध्ये विजय सुजयचाच होईल, असा आशावाद मुंडे यांनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles