माजी खासदार सुजय विखे यांनी नितेश राणेंना खडे बोल चुनावले असून मतदारसंघात जाती धर्मावरून तेढ निर्माण करत द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे. शिर्डीत कोणीही असुरक्षित नाही. या मतदारसंघात हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. अनेक वर्षापासून आपण एकोप्याने राहतो आहे. त्यामुळे जाती धर्म पाहून आम्ही काम करत नाही. जर कोणाला जातिवाद करायचा असेल तर आम्हाला सांगा. आम्ही सुद्धा अर्ज स्वीकारताना जात धर्म पाहू. तीस वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नकोय. याच शिर्डीमध्ये साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आणि तो संदेश आपल्याला भविष्यात देशभराला द्यायचा आहे. आज जनतेच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे हे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं नसल्याचे भाष्य सुजय विखे यांनी बोलताना केलं आहे. ते शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
- Advertisement -