Thursday, July 25, 2024

शिर्डीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ,जेईई नीट व सीईटी कोर्सेस डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डीत लवकरच क्रिकेट स्टेडियम करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवणार असून नवीन शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जे ई ई , नीट, सीईटी सारखे कोर्सेस सुरू करून याठिकाणी आय.टी.आय सुरू करणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. शिर्डी येथे स्वामी रिसॉर्ट ते काकडी एअरपोर्टकडे जाणार्‍या रस्त्या संदर्भात डॉ. सुजय विखे पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी संवाद साधून नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. ते म्हणाले शिर्डीतील नवीन शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यासंदर्भात बैठक घेतली. गुरुवारी पहिली ते दहावीपर्यंचे वर्ग नवीन शैक्षणिक संकुलात सुरू करण्यात येतील.

टप्प्याटप्प्याने इंग्लिश मीडियम स्कूल व 11 वी व 12 वी कॉलेजचे वर्ग लवकरच सुरू करण्यात येतील. पुढील वर्षी याठिकाणी विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जेईई, नीट व सीईटी कोर्सेस सुरू केले जाणार आहे. एम.आय.डी.सी.चे काम लवकरच सुरू होणार आहे. लवकरच आय.टी.आय कॉलेज सुरू करणार असून या आय.टी.आय मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शिर्डी एम.आय.डी.सी. मध्ये नोकरी मिळण्यासाठी उपयोग होईल. शेती महामंडळाकडून जागा उपलब्ध करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियमची उभारणीसाठी साईबाबा संस्थानकडे देणार आहोत. क्रिकेट स्टेडियममुळे शिर्डीचा जगभरात नवलौकिक होईल. स्वामी रिसॉर्ट ते एअरपोर्टकडे जाणार्‍या रस्त्यासाठी 32 वर्षांपासून 45 मीटरचे आरक्षण आहे.

या रस्त्यात अनेक नागरिकांची घरे जात असल्यामुळे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरिकांच्या विनंतीला मान देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेला रस्ता नगरपरिषदेकडे वर्ग करून सदर रस्ता 24 मीटर करण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवला. परंतु नगरपरिषदेकडे हा रस्ता करण्यासाठी तसेच या रस्त्याचे भूसंपादन करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने या परिसरातील नागरिकांना आपली जागा व्यावसायिक वापर करण्यासाठी तसेच रहिवासी बांधकाम करण्याकरिता परवानगी मिळत नसल्यामुळे गेल्या 32 वर्षापासून या परिसरातील विकास खुंटला आहे. नगर परिषदेकडे निधी नसल्यामुळे 24 मीटरचा रस्ता 9 मीटर करावा, असे काही नागरिकांनी या बैठकीत आपले म्हणणे मांडले. यावर डॉ.विखे पाटील यांनी नगरपरिषद 24 मीटर रस्त्याच्या मध्य काढून रस्ता करून द्यावा. शिर्डी व परिसरात वेगवेगळ्या योजना राबवून विकास करण्यासाठी प्रयत्न करू, असे यावेळी त्यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles