Tuesday, May 28, 2024

शिर्डीत सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी विखे पाटील, काळे एकत्र कोल्हेंची गैरहजेरी

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीनं प्रचारात आघाडी घेतली असल्याचं चित्र आहे. सदाशिव लोखंडे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम देखील नुकताच पार पडला. राज्यातील तीन मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डीतील महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे हे देखील उपस्थित होते. मात्र, कोपरगावचे भाजपचे विवेक कोल्हे याही कार्यक्रमाला गैरहजर राहिले होते. आशुतोष काळे यांनी हा मुद्दा उचलला होता, मात्र सदाशिव लोखंडेनी पण ते सोबत येतील, असं म्हटलं.

उद्घाटन सोहळा कार्यक्रमात आशुतोष काळे यांनी नाव न घेता कोल्हेंच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला तर विद्यमान खासदार लोखंडे यांनी माजी खासदार वाकचौरे यांच्यावर निशाणा साधत कोल्हे देखील आपल्याबरोबर राहतील असा विश्वास यावेळी बोलून दाखवला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे या सोहळ्यात अधिकच आक्रमक दिसले. चौफेर फटकेबाजी करत त्यांनी भाषणातून शरद पवार, उद्धव ठाकरेंसह थोरात यांच्यावर जोरदार टीका केली तर उमेदवार लोखंडे यांना सुद्धा सल्ला दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles