शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे हॅटट्रिकसाठी प्रयत्न करीत आहेत. खासदार लोखंडे यांनी गावागावात जाऊन प्रचार सुरू केला आहे. मात्र काही ठिकाणी त्यांना निष्ठावंत शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून लोखंडे यांच्या समोरच कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा जयघोष केला. ५० खोके एकदम ओके अशा घोषणांचाही लोखंडे यांना सामना करावा लागला.
शिर्डीत खा. सदाशिव लोखंडे यांच्या समोरच उद्धव ठाकरेंचा जयघोष… व्हायरल व्हिडिओची चर्चा!
- Advertisement -