शिर्डी लोकसभेची उमेदवारी रघुनाथ आंबेडकर यांनी करावी
कार्यकर्त्यांमधून मागणी
नगर (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभेची उमेदवारी रघुनाथ आंबेडकर यांनी करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. आंबेडकर भाजप कामगार आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सचिव तर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या कार्यकर्त्यांमधून त्यांच्या उमेदवाराची सूर उमटत असून, भाजपकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्याची मागणी हरेश्वर साळवे, योगेश कुलथे, प्रफुल्ल कुलकर्णी, शंकरराव पवार, एकनाथ राऊत, बाबासाहेब महापुरे, धनंजय शिंदे, प्रकाश कांबळे आदींसह कार्यकर्त्यांनी केली आहे.
शिर्डी मतदार संघातील विद्यमान खासदारावर स्थानिक जनता नाराज आहे. निवडून येणारा नवीन खासदार हा सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा असावा, त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहे. जनतेने देखील काम करणारा खासदार पाहिजे की, निवडून आल्यानंतर तोंड न दाखविणारा खासदार पाहिजे हे ठरविले पाहिजे. अनुसूचित जाती जमातीला न्याय मिळवून देवून बहुजन समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या नेतृत्वाची देशाला गरज आहे आणि यासाठी मोदी सरकार सक्षम आहे. भाजप विरोधी पक्ष खोटा प्रचार करून समाजाची दिशाभुल करत आहे. पक्षाने संधी दिल्यास सक्षमपणे निवडणुक लढवून निवडून येणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आंबेडकर यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही
- Advertisement -