Tuesday, May 13, 2025

शिर्डी एमआयडीसीत १ हजार कोटींचा डिफेन्स क्लस्टर…विमानाचे पार्टस बनणार…

शिर्डी येथे नव्याने मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्ये 1 हजार कोटी रुपयांच्या डिफेन्स क्लस्टरला मंजुरी!!

संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य शासनाच्या वतीने शिर्डी एमआयडीसी येथे डिफेन्स क्लस्टरला उद्योगमंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत शिर्डी एमआयडीसी येथील 200 एकर परिसरात 1 हजार कोटी रुपये खर्च करून एक मोठे डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

या डिफेन्स क्लस्टरच्या मध्ये राहाता तालुक्याचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या विमानाचे पार्ट्स बनविणाऱ्या कंपनीची घोषणा मा. उदयजी सामंत यांनी केली आहे. येत्या 10 दिवसात या डिफेन्स क्लस्टरचा एमओयू (MOU) शिर्डी येथे साईन करून त्या जागेचे भूमिपूजन केले जाणार आहे.

या 200 एकरावर उभ्या राहणाऱ्या डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच उर्वरित एमआयडीसी विकसित करण्यामध्ये देखील फार मोठा फायदा होणार आहे.

सदरील डिफेन्स क्लस्टरला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा.श्री.अजितदादा पवार साहेब, उद्योगमंत्री मा.श्री.उदयजी सामंत साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे मनःपुर्वक आभार!

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles